सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या ११ आमदारांना घरी बसवून शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची घोषणा करणारे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी ओपन चँलेंज दिलं होतं. २०१९ च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या नारायण राणेंनी येत्या २०२४ च्या निवडणूक रिंगणात उतरावं.मग शिवसेना काय आहे हे तुम्हाला कळेलच, अशा शब्दात थेट आव्हानच कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांना दिलं होतं.
यावर, आता भाजपने हे चॅलेंज स्वीकारून शिवसेनेला प्रतिआव्हान दिलं आहे. त्यामुळे सद्या कोकणातील राजकीय वातावरण तापलं आहे. ‘वेळ आणि काळ सांगा, आम्ही भाजप आमदार नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनीही त्याचवेळी राजीनामा द्यावा. 2024 च्या निवडणुकीची वाट न पाहता त्यांनी वेळ सांगावी. चारही निवडणुका पुन्हा होऊ देत, बघू सिंधुदुर्गची जनता कोणाला हद्दपार करते ते,’ असं चॅलेंज भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी दिलं आहे.
वैभव नाईकांचं आव्हान !
राणेंना माहिती असेल जर गेल्यावेळी राणेंचा मुलगा भाजपमध्ये गेला नसता तर तोही पराभूत झाला असता. खरंतर राणे जेव्हा जेव्हा आव्हान करतात त्या – त्या वेळी ते स्वत: त्यातून पळ काढतात. राणेंनी शिवसेना संपवण्याचे आव्हान केलं होतं, पण आता दुप्पट वेगाने शिवसेना वाढत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे,’ असेही वैभव नाईक म्हणाले.
‘राणेंना आमचं आव्हान आहे की, २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही पळ काढलात पण २०२४ मध्ये तुम्ही निवडणुकीला रिंगणात उतरावं आणि त्यावेळी शिवसेनेचे ११ आमदार येतात की २१ आमदार निवडून येतात हे तुम्हाला समजेल. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत तुम्ही निवडणुकीला उभे राहाचं, असं खुलं आव्हान शिवसेनेच्या वतीने करतो,’ असं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- राजू शेट्टीनी भरला हुंकार ; यापुढे कृषी आंदोलनं दिल्लीत होतील
- फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी करा – राजेश टोपे
- पवार पॉवर : राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच ! तब्बल ५ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- अर्नब गोस्वामींवर हात उचलणाऱ्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा – राम कदम
- गुटखा घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला आणि काऊंटरवरील सोनसाखळी घेऊन गेला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

