Share

पवार पॉवर : राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच ! तब्बल ५ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी चार दशकांचा भाजपसोबत असलेला संसार मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सद्या फक्त राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार यावर जवळजवळ निश्चिती असतानाच खडसेंनी भाजपला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर महाराष्ट्रात शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला असतानाच अजूनही काही आमदार आणि २०१९ विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपवासी झालेले नेते घरवापसी करणार असं भाकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते करत आहेत.

आता, कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजीव आवळे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. तर, गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीत पाच माजी आमदारांनी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे २०१४ पासून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबली असून आता इनकमिंगची लाट उसळली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ सदाशिव पाटील (खानापूर आटपाडी, सांगली) हे काँग्रेसमधून, उदेसिंग पाडवी (शहादा, नंदुरबार) हे भाजपमधून, सीताराम घनदाट (गंगाखेड, परभणी) हे अपक्ष तर रमेश कदम (चिपळूण, रत्नागिरी) या चार माजी आमदारांनी देखील प्रवेश केल्यामुळे आतापर्यंत एकूण पाच माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!