🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (National Congress president Sonia Gandhi) यांनी गेले सव्वा नऊ वर्षे Property tax भरला नसल्याचा धक्कादायक खुलासा RTI मध्ये झाला आहे. त्यांनी स्वतःच्या घराचा आणि इतर मालमत्तेचा प्रॉपर्टी टॅक्स भरल्या नसल्याने आता भाजप अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे.
“देशावर दीर्घ काळ सत्ता गाजवलेल्या काँग्रेस पक्षाच्या कामचलाऊ अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानाचे भाडे वर्षोनुवर्षे थकीत रहाणे हे त्यांच्या लुटारू मानसिकतेचे प्रतीक आहे. काँग्रेसचा जाहीर निषेध.”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधींवर टीका केली आहे.
देशावर दीर्घ काळ सत्ता गाजवलेल्या काँग्रेस पक्षाच्या कामचलाऊ अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानाचे भाडे वर्षोनुवर्षे थकीत रहाणे हे त्यांच्या लुटारू मानसिकतेचे प्रतीक आहे.
काँग्रेसचा जाहीर निषेध. pic.twitter.com/Q756tosvik— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 11, 2022
दरम्यान शहरी विकास मंत्रालया तर्फे मिळालेल्या RTI खुलाश्यात सोनिया गांधी यांनी दिल्ली मधील अकबर रस्त्यावरील काँग्रेस मुख्यालयाचा प्रॉपर्टी टॅक्स २०१२ डिसेंबर पासून भरला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा १२ लाख ६९ हजार आणि ९०२ रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स अजूनही शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंचा फडणवीसांसोबत बंद खोलीत संवाद; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- ‘त्या’ घटनेनंतर किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर
- ‘तो’ तर चहलच्या खिशात; डीजे ब्रावोचा विंडीज कर्णधारावर निशाणा
- आश्चर्यम! छातीत दुखत असल्याचे सांगून हॉस्पिटल न जाता नितेश राणे थेट मोदींच्या सभेत
- “त्यांनी माझ्या वाट्याचे श्रेय घेतले”; अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
