नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएच्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीत. त्यामुळे यूपीएचं नेतृत्व करण्यासाठी शरद पवार हे सक्षम व्यक्तिमत्व असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत हे आज नाशिकमध्ये होते. राऊत यांनी आज नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तसंच सचिन वाझे प्रकरणावर बोलताना कुणीही आलं आणि कोणत्याही प्रकरणाचा तपास केला तर सत्य समोर येईलच, असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं.
आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीयेत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाहीयेत. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार हे सक्षम नेतृत्व आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत कोरोनाचे १९ दिवसांत १२० बळी
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

