मुंबई : राज्यात पुन्हा कोरोना महामारीचा धोका वाढू लागला आहे. पुणे, मुंबई सारख्या भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. बॉलिवूड आणि टीव्हीवरील अनेक कलाकारांना या कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरी जावे लागले आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, निर्माते संजय लीला भन्साळी यांना कोरोनाकी लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘भिडेची’ ची भूमिका साकारणार्या मंदार चांदवडकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
या अगोदर मालिकेत सुंदरलालची भूमिका साकारणाऱ्या मयूर वाकानीला कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्याचपाठोपाठ मंदार चांदवडकरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना मंदार म्हणाले की, ‘हो, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. मी स्वत:ची काळजी घेत आहे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी करत आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
- ‘मास्क का नाही घातला’ असे विचारताच,पालिकेच्या कर्मचाऱ्याला महिलेने केली मारहाण
- ‘अभिन्न’ घडवणार मुला, मुलींची लिंगभेदा विषयी सकारात्मक मानसिकता, मोक्षदा पाटील यांचा उपक्रम
- दहावी-बारावीची लेखी परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार
- शिवरायांचा एकेरी उल्लेख : प्रश्नपत्रिकेवरून वाद निर्माण झाल्यानंतर शिष्यवृत्ती कमिटीचा खुलासा


