🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात शनिवार आणि रविवार कडक लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या रविवारी २१ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख १७ मार्गांवर ही बससेवा रविवारी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते सात यादरम्यान सुरू राहील. शहरातील विविध परीक्षा केंद्रांना लागून या बसेस धावणार आहेत, हे विशेष.
पालिका प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाने हा निर्णय शुक्रवारी (दि. १९) जाहीर केला. मागील आठवड्यातच आठ दिवसापूर्वी झालेल्या राज्य सेवेतील परीक्षेत शहरात कडक लॉकडाऊन असल्यामुळे अनेक परीक्षार्थींची अडचण झाली होती.
रविवारी शहरातील प्रमुख १७ मार्गांवर परीक्षार्थींसाठी ही सिटी बससेवा सुरू राहील. यात नक्षत्रवाडी ते हर्सूल सावंगी, हर्सूल सावंगी ते नक्षत्रवाडी, सिडको बसस्थानक ते विद्यापीठ, सिडको बसस्थानक ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते सिडको, रेल्वेस्टेशन ते रेल्वेस्टेशन रिंग रूट, सिडको ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते सिडको, सिडको ते औरंगपुरा, हर्सूल टी पॉइंट ते रेल्वेस्टेशन या मार्गांचा समावेश आहे.
या मार्गांवरून विविध भागात जाणार बसेस
हर्सूल टी पॉइंट येथून एसएससी बोर्ड, क्रांतीचौक, एसएफएस, सेव्हन हिल, एमजीएम, सेंट्रल नाका, जेएनईसी, चिश्तीया चौक, गुलमोहर कॉलनी, बजरंग चौक, एन-८ मनपा दवाखाना, एम-२ जायस्वाल हॉल, एसबीओ स्कुलपर्यंत बस जाईल. दुसरी बस सीबीएस औरंगपुरा सीबीएस ही बस निराला बाजार, वरद गणेश मंदिर, मार्गे परत सीबीएस येथे येईल. तिसरी बस सिडको औरंगपुरा सीबीएस अशी असून ती सिडको बसस्थानकापासून नाईक कॉलेज, रामा हॉटेल, सेव्हन हिल, एसएफएस, क्रांतीचौक, बाबा पंप, सीबीएस अशी धावणार आहे. तर रेल्वेस्टेशन ते औरंगपुरा ही बस रेल्वेस्टेशन येथून निघून एसएससी बोर्ड, क्रांतीचौक, सिल्लेखाना, निराला बाजार अशी धावणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
- ‘मास्क का नाही घातला’ असे विचारताच,पालिकेच्या कर्मचाऱ्याला महिलेने केली मारहाण
- ‘अभिन्न’ घडवणार मुला, मुलींची लिंगभेदा विषयी सकारात्मक मानसिकता, मोक्षदा पाटील यांचा उपक्रम
- दहावी-बारावीची लेखी परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार
- शिवरायांचा एकेरी उल्लेख : प्रश्नपत्रिकेवरून वाद निर्माण झाल्यानंतर शिष्यवृत्ती कमिटीचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

