🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही जेव्हापासून फिल्म इंडस्ट्री मध्ये आली तेव्हापासून लोकांना आणि तिच्या चाहत्यांना ती लग्न कधी करणार या गोष्टीची आतुरता आहे. इतके दिवस सोनाक्षी या गोष्टीबद्दल काहीच बोलली नाही. पण सोनाक्षीने आता तिच्या इंस्टाग्राम वरून हातात रिंग घातलेला फोटो शेअर करत, तिच्या एंगेजमेंटची हिंट दिली आहे.
सोनाक्षीची इंस्टाग्राम पोस्ट याचा पुरावा आहे. ती लवकरच तिच्या आयुष्याची नव्या सुरूवात एका नव्या व्यक्तीसोबत करणार आहे. तिने हिऱ्याची अंगठी घातली आहे. तिने पोस्ट च्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस. माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यास उत्सुक आहे. असा उल्लेख केला आहे.
रीमा कागतीने दिग्दर्शित केलेल्या अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या ‘फॉलन’ या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये सोनाक्षी सिन्हा पदार्पण करणार आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावणार आहे. यामाध्यमातून सोनाक्षी येत्या काही दिवसात वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :

