Share

क्रांतीचौक पोलीस वसाहतीत पोलीस पुत्राची आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : ‘मी आत्महत्या करतोय. मित्राकडे १८ हजार रुपये आहेत. त्याच्याकडून घेऊन ते वडिलांना दे ‘ असा मेसेज मित्राला पाठवून पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १) सकाळी क्रांती चोक पोलिस कॉलनीत घडली.

किरण शेषराव मोरे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. किरणचे वडील सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात हवालदार आहेत.नोकरी सिल्लोडला असल्याने ते पत्नीसह सिल्लोडलाच राहतात. क्रांती चौक पोलिस कॉलनीतील घर त्यांच्या नावाने असल्याने त्यांचा मुलगा त्या ठिकाणी राहत होता. त्यांचा मोठा मुलगा नोकरी करतो. किरणही अधूनमधून सिल्लोडला ये-जा करीत होता.रविवारी मध्यरात्री किरणने त्याच्या जवळच्या मित्राला आत्महत् असल्याचा करत मेसेज केला.

त्यानंतर दुसरा मेसेज पैशांसंदर्भात केला. त्यावेळी मित्र झोपलेला होता. सकाळी उठल्यानंतर त्याने मेसेज पाहताच त्याने त्याच्या घराकडे धाव घेतली. मात्र, किरण लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर जवळच असलेल्या क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेऊन हा प्रकार सांगितला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!