Share

ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू

Published On: 

बीड : बीड जिल्ह्यात एक ऱ्हदयद्रावक घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या मुलीचा नदीकाठी खेळत असताना तोल गेल्याने तिला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या आईचा व सोबत असलेल्या पुतणीचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे आज बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रंजना भागवत गोडबोले (वय ३०), अर्चना भागवत गोडबोले (वय १०), शितल हनुमान गोडबोले (वय ११) मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रंजना गोडबोले या नेहमीप्रमाणे आज सकाळी कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेल्या होत्या. सोबत मुलगी व पुतणीही होत्या. रंजना या धुणे धुण्यात व्यस्त असताना नदीकाठी खेळणारी मुलगी अचानक पाण्यात पडल्याने ती गोदापात्रात बुडू लागली.

यावेळी तिला वाचविण्यासाठी रंजना यांनी देखील गोदापात्रातील पाण्यात उडी मारली. दरम्यान गोदापात्रात धुणे धुणाऱ्या काही महिलांनी आरडा ओरड करत गावाकडे धाव घेऊन मदतीसाठी आवाहन केले. मात्र, गावातील तरुण येईपर्यंत रंजनासह त्यांची मुलगी व पुतणीचा तिघींचा बुडून मृत्यु झाला. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!