Share

एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक

Published On: 

रायगड : ६ जून ही तारीख महाराष्ट्राच्या, संपूर्ण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलं गेली. याच दिवशी स्वराज्यनिमिर्तीची मशाल रयतेमध्ये पेटवणाऱ्या शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला अन् राजं छत्रपती झाले. आता याच दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रायगडावरून आक्रमक आंदोलन केलं जाईल अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली असून मिळेल त्या वाहनाने रायगडावर दाखल व्हा, असा सांगावाचं त्यांनी दिला आहे.

दरम्यान, गेली कित्येक वर्षे रायगडावर शिवराज्याभिषेक दिन हा उत्साहात साजरा केला जातो. यावेळी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होत असतात. शिवराज्याभिषेक महोत्सव समिती ही सर्व आयोजन करत असते. आता या समितीच्या सदस्यत्वाची नोंदणी ऑनलाईन फॉर्मद्वारे सुरु केल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

संभाजीराजे म्हणतात…

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारो शिवभक्तांनी व्यक्त केली, त्याप्रमाणे पुढील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. किल्ले रायगडवरती शिवरायांनी ‘राज्याभिषेका’च्या प्राचीन प्रथेला पुनर्जिवित करून ६ जून १६७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करवून घेतला व एक सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही फिरवली.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1888208278004049

शिवराज्याभिषेकानंतरच ‘स्वराज्यास’ एक तात्विक बैठक मिळून शिवरायांनी चालविलेले उद्योग हे केवळ ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे, हे या राज्याभिषेकाने सिध्द केले. शिवरायांनी त्यावेळच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्याच ध्येय उद्देश्याने शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्य करत आहे. समिती सोबत जोडून कार्य करण्यासाठी पुढील लिंक वरती आपली संपूर्ण माहिती भरावी, असं आवाहन संभाजीराजेंनी केली आहे.

सदस्य होण्यासाठी –

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!