Share

आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये वीरमरण

Published On: 

🕒 1 min read

वाई (सातारा) : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आसले सुपुत्र जवान सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये वीरमरण आले आहे. लडाख येथे काल पहाटेपासून त्यांची नेमणूक होती. यावेळी हवामानातील बदलामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवायला लागला. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना त्वरित नजीकच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मांढरे यांचे निधन झाले.

घटनेची माहिती शनिवारी(१८ सप्टें.)सायंकाळी वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना मिळाली. त्यांनी लगेच ही दुःखद बातमी आसले येथील मांढरे यांचे भाऊ महेश मांढरे यांना कळवली. सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मांढरे यांच्या पश्चात्त त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. तसेच मांढरे पार्थिव उद्या पहाटे दिल्ली येथे पोहोचेल. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते आसले या मूळ गावी नेण्यात येईल. तद्पश्चात त्यांच्यावर शासकीय इतमामात येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!