🕒 1 min read
मुंबई : माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग सध्या कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. जरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी सतत क्रिकेटच्या चालू घडामोडींवर भाष्य करत असतो. नुकतीच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी त्याच्या चर्चेचे कारण दुसरच आहे.
युवराज आणि हेजल आई-बाबा होणार असल्याच्या जोरदार चर्चा चालू आहेत. रविवारी (२८ फेब्रुवारी) हेजलचा ३४ वा वाढदिवस होता. यानिमित्ताने युवराजने आपल्या काही मित्रांसह तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळचा एक व्हिडिओ आणि काही फोटो युवराजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
त्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये हेजल गर्भवती असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी युवराजच्या पोस्टवर तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हेजलला वाढदिवसा बरोबर लवकरच आई बनण्यासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी युवी सर ज्युनियर युवराजचे कधी आगमन होईल, असे विचारले आहे. असे असले तरीही, युवराज आणि हेजल यांनी अधिकृतपणे या गोष्टीची घोषणा केलेली नाही.
https://www.instagram.com/p/CL1i_DFD-nC/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील नुकतेच आई- बाबा झाले आहेत. अनुष्काने ११ जानेवारीला मुंबईत मुलीला जन्म दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- हवेत सूर मारत पंड्याने एकहाती पकडला भन्नाट झेल ; व्हिडिओ व्हायरल
- कोहलीवर बीसीसीआयकडून दडपण टाकले गेले असावे : स्ट्रॉस
- धक्कादायक! अनाथ बालकाआश्रमातील अधीक्षकानेच केला अत्यचार
- व्यापाऱ्याच्या सिनेस्टाईल अपहरणाचा कट उघडकीस; दोन कोटींच्या खंडणीसाठी आखला होता प्लॅन
- मैदानात झोपून रोहितचा पिचवर टीका करणाऱ्यांवर निशाणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
