🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
अशातच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याला विस्फोटक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि लक्षणीय क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जाते. इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. परंतु अद्याप त्याला एकाही सामन्यात अंतिम एकादशमध्ये संधी मिळालेली नाही. तरीही पंड्या नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. नुकताच त्याचा सरावादरम्यान अप्रतिम झेल पकडतानाचा व्हिडिओ पुढे आला आहे.
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थातच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंड्या क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे. दरम्यान एक चेंडू पकडण्यासाठी तो धाव घेतो आणि हवेत उंच उडी मारत एका हाताने चेंडू झेलतो. एका चाहत्याने पंड्याच्या या भन्नाट झेलचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
@hardikpandya7 #hardikpandya #INDvENG #TeamIndia #ViratKohli @BCCI #hardikpandya #fan Hardik pandya ♥???? pic.twitter.com/AU8m6FEr3K
— ???????????????????????????????? ???????????????????????? (@Jitendar_Paviya) February 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
