अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली. या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या सीरिजची चौथी आणि अखेरची टेस्टही याच मैदानात खेळवली जाणार आहे, त्यामुळे या मॅचसाठीचं पिच कसं असेल, याबाबत कयास बांधले जात आहेत.
या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर अनेकांनी टीका केली होती. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या खेळपट्टीचे समर्थन केले. त्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉस याने संताप व्क्त केला आहे. अशा अत्यंत सुमार व दर्जाहिन खेळपट्टीचे समर्थन करुन कोहली चूक करत आहे, अशा शब्दात त्याने आपला कोहलीवरचा संताप बाहेर काढला आहे.
येथे झालेली तिसरी कसोटी प्रकाशझोतात खेळवण्यात आली होती. पाच दिवसांचा हा सामना केवळ दोनच दिवसांत संपला. त्यावर दोन्ही देशांतील आजी माजी क्रिकेटपटूंनी आपली मते व्यक्त केली. कोहलीने मात्र, या खेळपट्टीचे समर्थन केले. त्यावर स्ट्रॉसने कोहलीला खडेबोल सुनावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी


