Share

व्यापाऱ्याच्या सिनेस्टाईल अपहरणाचा कट उघडकीस; दोन कोटींच्या खंडणीसाठी आखला होता प्लॅन

Published On: 

जालना : जालन्यात व्यापारी राजेश सोनी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरणाचा प्लॅन आखला असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना विविध ठिकाणांहून अटक केली. दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक खंजीर आणि एक कार असा १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

अपहरणासाठी आरोपी सर्वप्रथम रेल्वेने पुण्याला गेले. त्यानंतर तेथून ईर्टिगा वाहन भाड्याने घेतले. पुण्याच्या बाहेर आल्यानंतर चालकाला मारहाण करून त्याला गाडीबाहेर फेकून दिले. नंतर गाडीची नंबर प्लेट काढून ती गाडी घेऊन जालन्याला आले. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी नाव्हा रोडवरील दत्त मंदिराच्या पार्किंगमध्ये राजेश सोनी यांच्या प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबूराव मुजमुले (२६, परतूर), विशाल संजय जोगदंड (२०, मजुरी, रा. जोगदंड मळा, जालना), भागवत ऊर्फ संभ्या बालाजी राऊत, पांडुरंग ऊर्फ ओम बबन राऊत (२४, वैद्यचा मळा, जालना), मोहंमद इरफान मलिक (पडेगाव कासमगल्ली दर्गा, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी व्यापारी राजेश भगवानदास सोनी हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाव्हा रोडवरील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून डीत बसण्यास सांगितले. मात्र, संशय आल्याने परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाल्याने आरोपींनी घाबरून तेथून पळ काढला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!