Share

अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत

Published On: 

मुंबई : ज्याप्रमाणे बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी गुप्त योजना असल्याच्या चर्चा असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्स च्या देख्हील जीवनाबद्दल माध्यामांमध्ये चर्चा असतात आता देखील अशीच एका खेळाडूच्या सुट्टी दरम्यान एक बातमी आली आहे. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूचा विवाह होणार आहे.

यामध्ये काही जण गुपचूप लग्न उरकून घेतात तर काही मोठ्या थाटामाटात लग्न करतात. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर.आश्विन यांचा लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक आकर्षण होतं. आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अंतिम चरणात आली असताना अचानक त्याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यानंतर त्याचे माघार घेण्याचे कारण लग्न असून तो एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसह लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले असून बुमराहची वधूराणी कोणी अभिनेत्री नसून ती एक स्पोर्ट अँकर असल्याची कुजबूज चालू आहे.

https://www.instagram.com/p/CHKgy2bp__q/?utm_source=ig_web_copy_link

त्याचे झाले असे की, लग्नाच्या सबबामुळे सुट्टी घेतली खरी, पण बुमराह नक्की कोणासोबत सात फेरे घेणार? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घोंगावत आहे. बुमराहची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिनेही सुट्टी घेतल्याने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.

तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांना आपल्या सुट्ट्यांची माहिती दिली, ज्यात तिने गालाला रंग लावल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘हॅपी हॉलिडे टू मी’. तिच्या या कॅप्शनमुळे बुमराह आणि तिच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला. मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी बुमराहने तिच्या एका पोस्टवर कमेंट केल्याने त्यांच्यात अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

https://www.instagram.com/p/CL3uW_0JSE5/?utm_source=ig_web_copy_link

एकीकडे बुमराहची वधूराणी अनुपमा आहे, अशी चर्चा चालू असताना दुसरीकडे संजना गणेशन हिचेही नाव बुमराहशी जोडले जात आहे. संजना ही आयपीएलमध्ये क्रिकेट प्रेझेंटर आणि आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या फॅन शोमध्येही दिसून आली आहे. पुण्यातील सिंबॉयसीस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची विद्यार्थीनी असलेली संजना बुमराहची जीवनसंगिनी होणार असल्याची कुजबूज चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!