🕒 1 min read
अँटिंगा : जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट चा सामना आयोजीत करण्यात आला. मात्र पहिल्याच सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फंलदाज केरॉन पोलार्ड याने श्रीलंकेचा गोलंदाज अखीला धंनजयला लागोपाठ सलग सहा उत्तुंग षटकार ठोकले आहेत. महत्वाची बाब म्हणजे धनंजयने या षटकाराआधिच हॅटट्रीक घेतली. पण पोलार्डने त्याचा आनंद क्षणभरही टिकू दिला नाही. या विक्रमानंतर पोलार्ड हा भारताचा युवराज सिंग व दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्ज यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
श्रीलंका आणि वेस्ट इंडीजच्या संघात तीन टि-२० सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना आज अँटिंगा येथे खेळला गेला. या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत ९ गडी गमावत १३१ धावांचे लक्ष दिले. प्रत्युतरात वेस्ट इंडिज संघाने धमाकेदार सुरुवात करत पहिल्या तीन षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र तिसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या अखिला धनंजय याने एव्हीन लुईस, ख्रिस गेल व निकोलस पुरन या तिन्ही फलंदाजाना लागोपाठ बाद करत हॅटट्रीक नोंदवली. पण धंनजयचा हा आनंद काही काळच टिकला.
You will never have a better Mastercard Priceless Moment than this one! ???????? @KieronPollard55 became the 1st West Indian to hit 6 sixes in a T20I over!#WIvSL #MastercardPricelessMoment #MenInMaroon pic.twitter.com/YOGItXOY8H
— Windies Cricket (@windiescricket) March 4, 2021
धनंजयच्या हॅटट्रीक नंतर पुढच्याच षटकात केरॉन पोलार्डने लागोपाठ षटकार लगावले. या षटकारानंतर पोलार्ड वर सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना पोलार्ड म्हणाला की पहिल्या तीन षटकारानंतर मला वाटले की मी सहा षटकार मारु शकतो असे म्हणाला. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने श्रीलंका संघाचा ४ गडी राखुन पराभव केला आहे. तर केरॉन पोलार्ड सामनावीर म्हणून घोषीत केले.
महत्वाच्या बातम्या
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
- ‘सर्वोच्च न्यायालयानेही सरकारच्या ‘देशद्रोही’ ठरविण्याच्या बेलगाम वृत्तीवरच बोट ठेवले’
- न्यूझीलंडमध्ये आम्ही 3 दिवसांत हरलो तेव्हा कुणी बोलले नाही? खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना कोहलीचे उत्तर
- रेल्वे प्रश्नासाठी मराठवाड्यातील खासदारांची एकजूट; रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
