पणजी : भारतीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. उत्तरप्रदेश,गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. तर या विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे.
या पाच राज्यात सध्या सर्वत्रच राजकीय रणधुमाळीने वेग पकडला आहे. गोवा राज्यात २०१२ पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोवा राज्यात प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. यंदाची गोवा विधानसभा निवडणुक भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोनच पक्षात चुरशीची होईल असे वाटत असतानाच आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याच्या राजकारणात उडी मारली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि गोवा राज्यातील सरकारने या राज्यासाठी काय केले असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या गोवा राज्य प्रभारी सुश्मिता देव यांनी केला आहे.
गेले काही वर्ष गोवा राज्यात तृणमूल काँग्रेसची राजकीय स्थिरता वाढत आहे, गेल्या काही वर्षात तृणमूल काँग्रेसला गोव्याच्या जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे याबद्दल देखील तृणमूल काँग्रेसच्या गोवा राज्य प्रभारी सुश्मिता देव यांनी गोव्याच्या जनतेचे आभार मानले आहेत. सुश्मिता देव यांनी भारतीय जनता पक्षाला डबल इंजिन सरकार म्हणून संबोधले आहे, तसेच खाणकाम असो किंवा तीन रेषीय प्रकल्प असो, बेरोजगारी असो, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे पोर्ट अथॉरिटीमध्ये रूपांतर झालेले असो, प्रत्येक मुद्द्यावर धोरणाबाबत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे.’ असे देखील त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- आमदार सतीश चव्हाणांचा कॉंग्रेसला राम राम; कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
- ‘गोव्यात बेरोजगारी वाढण्यास भाजप जबाबदार’; नवाब मलिकांचा आरोप
- जामीन मिळताच नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; “…म्हणून मी सरेंडर झालो”
- अमरावती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सोमवारपर्यंत काम बंद आंदोलन
- पुष्पाची क्रेझ थांबेना! श्रीवल्ली गाण्यावर थिरकली राणू मंडल; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

