Share

ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले आहेत. अशी माहिती भाजपाकडून देखील देण्यात आली आहे.

ग्रेटा थनबर्गने ट्विटरवर स्ट्राईक टूल किटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले आहे.

यासह ग्रेटाने शेअर केलेल्या डॉक्युमेंटमध्ये तिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला फॅटिस्ट सत्ताधारी पक्ष असेही संबोधले असल्याचे सांगितले जात आहे. आस्क इंडिया व्हाय असा शीर्षकाखाली ग्रेटाने हे डॉक्युमेंट असून शेतकरी आंदोलनाला जागतिक पातळीवरून समर्थन देण्याकरता हे नियोजन होते. यासह २६ तारखेवर लक्ष केंद्रित करून शक्य तितक्या कमी वेळात निषेध कऱणारी आंदोलनाचं आयेजन करा. कारण सुरू असलेले हे प्रकरण लवकर संपेल असे दिसत नाही, असेही ग्रेटाने या शेअर करून डिलीट केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!