🕒 1 min read
नवी दिल्ली: इंडिया गेटजवळील ‘अमर ज्योती’ ची मशाल आज विझवली जाणार आहे. आज दुपारी याचा एक हिस्सा नैशनल वॉर मेमोरियल येथे नेण्यात येणार आहे. यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी तीव्र नाराजी जाहीर केली आहे. काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर नाराजी जाहीर केली आहे.
“खूप दुःखद बाब आहे की, आपल्या वीर सैनिकांसाठी जळत असलेली अमर ज्योति आज विझवली जाणार आहे. काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही.काही हरकत नाही, आम्ही आपल्या सैनिकांसाठी अमर ज्योति पुन्हा एकदा लावणार” असे ट्वीट राहू गांधी यांनी केले आहे.
बहुत दुख की बात है कि हमारे वीर जवानों के लिए जो अमर ज्योति जलती थी, उसे आज बुझा दिया जाएगा।
कुछ लोग देशप्रेम व बलिदान नहीं समझ सकते- कोई बात नहीं…
हम अपने सैनिकों के लिए अमर जवान ज्योति एक बार फिर जलाएँगे!— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2022
दरम्यान इंडिया गेटजवळील ‘अमर ज्योती’ ची स्थापना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७२ साली याचे उद्घाटन केले होते. गेल्या ५० वर्षांपासून इंडिया गेटजवळ ही अमर ज्योती जळत होती. आज राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे ही अमर ज्योति स्थापित करण्यात येणार आहे. जी इंडिया गेटपासून ४०० मीटर लांबीवर आहे. मात्र या निर्णयामुळे कॉंग्रेसने तीव्र नाराजी जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पंतप्रधान मोदी ठरले ‘ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग’मध्ये जगात भारी
- “समर्थ राष्ट्र म्हणून पाकिस्तान कधीच उभा राहू शकला नाही”
- मुंबईतल्या शाळांच ठरलं, पुण्यातल्या शाळांचं काय?; महापौर म्हणतात…
- दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट!
- ‘कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे…’; आव्हाडांची अमोल कोल्हेंवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
