Share

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu arjun) याचा पुष्पा (Pushpa) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या यशामध्ये अल्लू अर्जुनसोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही वाटा आहे. आणि त्याची लवकरच भेट घेणार आहे.

आपल्याला माहित आहे का, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस तळपदे (Shreyas talpade) आहे. पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयसने त्याचा आवाज दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी श्रेयसवरही शुभेच्छांचा वर्षाव होत असतांना त्याला अल्लू अर्जुनने त्याच्या कामाचे कौतूक केले आहे.

तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने श्रेयसचे आभार मानले असून लवकरच तुला भेटेन असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CYvRi7cI6DM/?utm_source=ig_web_copy_link

श्रेयस, या चित्रपटासाठी तू जो छान आवाज दिलास त्यासाठी मनापासून तुझे आभार. लवकरच भेटुयात आपण. आज ऑन कॅमेरा मला तुझे आभार मानायचे आहेत. ‘पुष्पा’साठी तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी खूप आभार, असं अल्लू अर्जुन म्हणाला.

हा व्हिडीओ श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत अल्लू अर्जुन आणि मनीष शाहचे आभार मानले आहेत. ”पुष्पासाठी माझ्या आवाजाची निवड केली यासाठी खूप धन्यवाद, असं त्याने म्हटलं आहे. या चित्रपटात अल्लु अर्जुनने पुष्पाराज ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना हिने श्रीवल्ली ही भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!