Share

“समर्थ राष्ट्र म्हणून पाकिस्तान कधीच उभा राहू शकला नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विद्यमान पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच समर्थ राष्ट्र म्हणून पाकिस्तान कधीच उभा राहू शकला नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’हिंदुस्थानातून फुटून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानची निर्मिती कागदावर तर झाली, पण एक देश किंवा समर्थ राष्ट्र म्हणून पाकिस्तान कधीच उभा राहू शकला नाही. अन्न आणि गरिबी यावर खर्च करण्याऐवजी शस्त्रास्त्रांची खरेदी आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठीच पाकिस्तानच्या तिजोरीतील पैसा पाण्यासारखा खर्च होत राहिला.’ तसेच पाकिस्तानच्या विद्यमान पंतप्रधानांना ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ म्हणून तेथील विरोधी पक्ष आज हिणवत असला तरी पाकिस्तानच्या या विपन्नावस्थेला तेथील सर्वच राजकीय पक्ष, लष्कर आणि जनताही तेवढीच जबाबदार आहे, असेही राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,’देश कुठलाही असो, पण त्या देशातील जनतेची एकमेव अपेक्षा काय असते तर आपला देश आर्थिक बाबतीत स्वावलंबी व कणखर असावा आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाची वाटचाल ताठ मानेची असावी. पाकिस्तानची जनता मात्र याबाबतीत फारच कमनशिबी ठरली. पाकिस्तानात आजवर अनेक राजवटी आल्या आणि गेल्या,पण तेथील शासकांच्या हाती असलेला भिकेचा कटोरा मात्र कधीच बदलला नाही. कर्ज आणि आर्थिक मदतीसाठी याचक बनून जागतिक संस्थांसमोर झोळी पसरून उभा असलेला पाकिस्तान हे चित्र पाकिस्तानला कधीच बदलता आले नाही. आजही पाकिस्तानात हीच परिस्थिती आहे.’

दरम्यान, पाकिस्तानात सद्यस्थितीत भयंकर आर्थिक अराजक माजले आहे आणि देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणणारे इम्रान खान हे ‘पंतप्रधान’ नसून ‘इंटरनॅशनल भिकारी’ आहेत अशी टीका पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी केली आहे. कुठल्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखांविषयी तेथील देशवासीयांनी असे उद्गार काढणे हे त्या देशाचेच दुर्दैव म्हणायला हवे, असेही राऊत लेखात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!