नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जागतिक स्तरावरील अॅप्रूव्हल रेटिंग या सर्वेक्षणामध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले आहे. यात मोदी ७१ टक्क्यांनी प्रथम स्थानावर आहेत. त्यामुळे सर्वाधिक लोकमान्यता असणारे नेते म्हणून नरेंद्र मोदी प्रथम स्थानावर आहेत.
नरेंद्र मोदींनी या यादीत १३ नेत्यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/wRhUGstJrS
Modi: 71%
López Obrador: 66%
Draghi: 60%
Kishida: 48%
Scholz: 44%
Biden: 43%
Trudeau: 43%
Morrison: 41%
Sánchez: 40%
Moon: 38%
Bolsonaro: 37%
Macron: 34%
Johnson: 26%*Updated 01/20/22 pic.twitter.com/nHaxp8Z0T5
— Morning Consult (@MorningConsult) January 20, 2022
दरम्यान या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत. तर या यादीत तळाशी ११ व्या स्थानी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो, १२ व्या स्थानी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय यादीत पुन्हा एकदा एका सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- पंतप्रधान खरोखर बेटी बचाव..बेटी पटाव म्हणाले? पाहा व्हिडीओ
- केंद्र सरकारचा ‘हा’ निर्णय देशातील विरोधकांची मुस्कटदाबी ठरता कामा नये – अमोल कोल्हे
- मुंबईतल्या शाळांच ठरलं, पुण्यातल्या शाळांचं काय?; महापौर म्हणतात…
- दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट!
- ‘कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे…’; आव्हाडांची अमोल कोल्हेंवर टीका

