पुणे: राज्यात कोरोना (Corona) गेल्या काही महिन्यांपासून वाढत असल्याने राज्यसरकारने कडक निर्बंध लावले होते. या पार्श्वभूमीवर शाळा तसेच महाविद्यालये देखील बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र बुधवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं २४ जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु (Schools Re-opening) करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. मुंबईतील शाळा या २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत, तर राज्यातल्या शाळा या २४ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शाळा सुरु करण्याचा निर्णय सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतला जाईल ! pic.twitter.com/qodA4BbaPD
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 20, 2022
दरम्यान पुण्यातल्या शाळा सुरू करण्याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी माहिती दिली आहे. महापौर म्हणाले, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. आज पहिलं तर जवळपास ७ हजारावर कोरोना रुगाण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असताना शाळा सुरू करणं योग्य नाही. पहिल्या लाटेत लहान मुलांना कसलेच लक्षणं दिसत नव्हते मात्र या लाटेत लहान मुलांना बाधा झाली की ताप येतोय. त्यामुळे यावर थोडा विचार करावा असं बालरोग तज्ञांनी सांगितले आहे, असं मोहोळ यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट!
‘कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे…’; आव्हाडांची अमोल कोल्हेंवर टीका
चक्क रश्मि देसाईनं लगावली देवोलिनाच्या कानशिलात; व्हिडीओ व्हायरल


