Share

रसिकांना अपार सांस्कृतिक श्रीमंती देणार्‍या लतादीदींच्या जाण्याने अलौकिक पर्वाची सांगता-सतिश चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: भारतरत्न, गानसम्राज्ञी लताजी मंगेशकर(Late Mangeshkar) यांचं निधन वेदना देणारे आहे. सांगीतिक योगदानामुळे लतादीदी विश्ववंदनीय ठरल्या. रसिकांना अपार सांस्कृतिक श्रीमंती देणार्‍या लतादीदी यांच्या जाण्याने एका अलौकिक पर्वाची सांगता झाली आहे. मात्र त्यांनी गायिलेल्या गीताप्रमाणे ‘मेरी आवाज ही पहचान है’ ही त्यांची आवाजाची जादू प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहील. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण(Satish Chavan) यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमदार चव्हाण यांनी यावेळी लतादीदींच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. ते म्हणाले औरंगाबाद शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त लतादीदींसोबत काम केलेल्या अनेक गायक-वादकांनी त्यांच्या सोबतच्या आठवणी औरंगाबादकरांना सांगितल्या आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असून, देशाने एक अलौकिक ‘स्वर रत्न’ गमावले आहे. गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी (दि. ६) सकाळी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. यामुळेच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होता असतांनाच आज त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. आणि त्यातच आज त्या संपूर्ण सिनेसृष्टीला पोरकं करून गेल्या. त्यांच्या आरोग्यासाठी लाखो चाहत्यांनी प्रार्थना केली होती. आपल्या सुमधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली. आजदो पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिये…असं सर्वांनाच लता मंगेशकर पोरकं करून गेल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!