🕒 1 min read
अहमदनगर : मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्य सरकारमधील नेते आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता एका युवा खासदाराने एका युवा आमदारावर त्यांच्यात मतदारसंघात जाऊन टीका केल्याची बातमी हाती येत आहे. भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असतं. तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीएच तेवढे काय ते आहेत,” असा टोला खासदार सुजय विखेंनी आमदार रोहित पवारांना लगावला आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील शिरपूर येथे एका सभेत खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.
मतदारसंघातील कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर रोहित पवारांकडून दबावतंत्र सुरु असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. विखे पाटील म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाचे उद्घाटन मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कामाची मंजुरी माजी मंत्री राम शिंदे यांच्या कार्यकाळात झाली आहे. त्यांनीच या कामाला मंजूरी दिली आणि निधीही त्यांनीच आणला. पण नारळ फोडण्यासाठी भलतेच लोक गोळा झाले. आमदार राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करतात, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. मिरजगावमधील रस्त्याची दुर्दशा एकदा आमदाराने पाहावी. आता राष्ट्रीय महामार्गाचे काम आमच्यावर सोडा, तुम्ही आणलेल्या निधीतील रस्ता तरी आधी पूर्ण करा, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
