Share

‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’

Published On: 

कराड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज त्यांना कराड येथेच पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळे सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे.

ठाकरे सरकार बेकायदेशीररित्या अटक करण्याचा डाव आखत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. तर महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दाखल होत ते कोल्हापूरला निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना कराड येथे रोखले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीसह हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी देखील सोमय्या यांना विरोध करण्यासाठी जय्यत तयारी केली असून मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईत पोलिसांनी सोमय्या यांना केलेल्या स्थानबद्धतेचा भाजपने तीव्र निषेध केला आहे.

दरम्यान कराड येथे रोखत पोलिसांनी किरीट सोमय्या यांना कराड येथील शासकीय विश्रामगृहात हलवले आहे. तसेच सोमय्या याप्रकरणी सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!