Share

‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले

Published On: 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल बीडमधील विविध बैठकी व राजकीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. आज सकाळीच ते परळीत दाखल झाले. यावेळी परळीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या अभूतपूर्व स्वागताने जयंत पाटीलही भारावले. माझ्या लग्नातही एवढी मोठी वारात काढली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याचे तिसरे पर्व सुरु झाले आहे. त्यांची यात्रा बीड जिल्ह्यातील परळीत आली असता कार्यकर्त्यांनी बैठकीचे रुपांतर मेळाव्यात केले. त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना म्हणाले, धनंजय मुंडे हे अत्यंत प्रतिभावान नेते आहेत, परळी मतदारसंघासह राज्यात पुढील काळात त्यांच्या हातून विकासकार्य होणे अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत परळीचा त्यांच्या हातून बारामतीसारखा विकास होईल. त्यासाठी परळीकरांनी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहून पाठबळ द्यावे, असे अवाहनही जयंत पाटील यांनी केले. यावेळी आभार मानताना जयंत पाटल म्हणाले, माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी काढली नव्हती, असेही पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्यानंतर मला सर्वच स्तरावर खलनायक ठरविण्यात आले होते. लोकांच्या भावनिक प्रचारामुळे अनेकांनी मला शिव्या दिल्या, परंतु परळीच्या मातीतील माणसांनी मला उभारी दिली. पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी मला संधी दिली आिण मी आज राज्याचा मंत्री होऊ शकलो. या मातीचे व पक्षाचे ऋन मी कधीच फेडू शकत नाही असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार संजय दौड, जिप अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जयसिंगराव गायकवाड आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!