Share

मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून

Published On: 

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड पुसद मार्गावरील दहेगाव पुलावरील पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची घटना घडली आहे. या बसमधील दोन प्रवासी एका झाडावर तर दोन प्रवासी बसच्या टपावर चढून बसले असून, त्यांची सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि तालुका आपत्ती निवारण दल प्रयत्न करत आहेत. उमरखेडचे तहसीलदार आणि अन्य प्रशासकीय अधिकारी घटना स्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. वाशीम, नांदेड, नाशिक, धुळे, सोलापूर, हिंगोली आदी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पूर आले आहेत. धरणं भरल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे, तर गांवामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. शेतीचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या 31 नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं बचाव कार्य सुरू केलं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी ही माहिती दिली. सततच्या पावसामुळे मांजरा धरण भरलं असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!