Share

IND vs SA 2022 : भारतीय संघात संजू सॅमसनला स्थान का नाही? क्रिकेटच्या चाहत्यांचा बीसीसीआयला सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम संपल्यानंतर लगेच भारतीय संघ मायदेशातच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी १८ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा BCCI ने रविवारी केली. आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये छाप उमटवणाऱ्या युवा खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे. तर चांगल्या कामगिरीनंतरही काही खेळाडूंना संघाबाहेर बसवण्यात आले आहे.

बीसीसीआयने घोषित केलेल्या भारतीय संघात संधी न मिळालेल्या खेळाडूंपैकीच एक नाव म्हणजे संजू सॅमसन. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार सॅमसनचं नाव संघात नसल्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांनी BCCI ला ट्विटरवर चांगलंच ट्रोल केले. संजू सॅमसन कुठे आहे? असा सवाल क्रिकेट चाहते BCCI ला हशटॅग करत विचारत आहेत.

https://twitter.com/dsgurja27125050/status/1528358530151235586?t=4jq0-0kuSIeGL0twtf9tHQ&s=19

आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार संजू सॅमसनने चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करत राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले आहे. त्याचबरोबर हैदराबाद संघाकडून खेळणारा राहुल त्रिपाठीचीदेखील निवड न झाल्याबद्दल फॅन्स सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. या दोन क्रिकेटपटूंना वगळण्यात आल्याबद्दल नाराज झालेल्या चाहते ट्विटरवर आपली निराशा व्यक्त करत आहेत.

राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसनची निवड का नाही?

त्रिपाठी आणि सॅमसनला संघाबाहेर ठेवल्यामुळे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. राहुल त्रिपाठी हा आयपीएलमध्ये गेल्या काही सीझनमध्ये सातत्यपूर्ण धावा करणारा खेळाडू आहे. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असताना राहुल त्रिपाठी हा योग्य पर्याय असून तो पात्र असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन दोघेही टी-२० संघाचा भाग होण्यास सक्षम आहेत. दोघांनीही गेल्या दोन आयपीएलमध्ये चांगल्या स्ट्राइक रेटसह धाव केल्या असून त्यांच्या कामगिरीतही सातत्य आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी त्रिपाठी आणि संस्थांची निवड न झाल्याने क्रिकेट चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!