Share

“2008 पासून शोधतोय, कधी विमानतळावर भेटलो तर…” ; ब्रिजभूषण यांचा राज ठाकरेंना इशारा

Published On: 

🕒 1 min read

लखनौ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. हा दौरा रद्द करण्यामागे महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. मात्र त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले आहे. मात्र, हा दौरा रद्द करण्यामागे भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचाही हात असल्याचे मानले जात असून, राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी सातत्याने केली होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही ब्रिजभूषण सिंह गप्प बसले नाहीत, ठाकरे यांची कधीतरी भेट झाली तर नक्कीच दोन हात करू, असे ते म्हणाले.

एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह देवरिया येथे गेले होते. तिथे त्यांनी राज ठाकरेंवर वक्तव्य केले. ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “2008 पासून त्यांचा (राज ठाकरे) शोध घेत आहेत. ते कधीतरी विमानतळावर भेटले तर त्यांच्याशी नक्कीच दोन हात करु.”

आम्ही सर्व रामाचे वंशज-

“आता राज ठाकरे यांचे मन बदलले असून त्यांना अयोध्येत यायचे आहे. मात्र जोपर्यंत ते उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आम्ही सर्व रामाचे वंशज आहोत आणि त्यांनी त्यांचा अपमान केला आहे, मारहाण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे माफी मागितली तरच ते अयोध्येत येऊ शकतो,” असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!