Share

सोमय्यांनी आधी राणे, गावित, पाचपुते या नेत्यांवर आरोप केले; आता ते भाजपमध्येच गेले – राष्ट्रवादी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र भाजपने ते किरीट सोमय्या यांनी सुरू ठेवलं. अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडायला सुरुवात केल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी, मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण १२ जणांनी विविध भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असून मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सुरु आहेत. दरम्यान, भाजपसह सोमय्यांनी या आधीच्या काळात ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते नेते आता भाजपमध्येच गेले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपमध्ये गेल्याने कोणतीही कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘किरीट सोमय्या यांनी अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमय्या यांनी आधीदेखील कृपाशंकर सिंह, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्यावर आरोप केले होते. आज ही मंडळी भारतीय जनता पक्षात आहेत,’ असं महेश तपासे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!