Share

‘सोमय्यांना दिल्लीत मुजरा करता येईना, म्हणून ते गल्लीत गोंधळ घालताहेत’, काँग्रेसचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. कोल्हापूरला जाण्यास मज्जाव करण्यासाठी ठाकरे सरकारने हे कारस्थान केल्याचा आरोपा सोमय्या यांनी केला आहे. ‘मला गणेश विसर्जनासाठी देखील जाण्यास दिले जात नाही आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या अटकेसाठी डझनभर पोलीस घराबाहेर पाठवले आहेत’ असे ते म्हणालेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

यानंतर आता काँग्रेसनेही या वादात उडी घेत भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार केला आहे. ‘सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे’ या शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे.

सावंत यांनी ट्विट केले आहे की, ‘सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच ‘फडणवीस सरकारच्या काळात केवळ कडकनाथ कोंबड्या दाखवल्या म्हणून तडीपार करणारे, सभेत काळे कपडे घालण्यास मनाई करणारे व आंदोलना आधीच स्थानबद्ध करणारे भाजपा नेते सोमय्यांना नोटीस दिली म्हणून गळे काढत आहेत. बाबांनो, सोमय्या कोणाच्याही मालमत्ता बेनामी म्हणून दाखवतात म्हणून जनतेत घबराट आहे. दुसऱ्याच्या मालमत्ता तिसऱ्याची म्हणून सांगितल्यावर लोक बोंब मारणार की नाही? सोमय्यांच्या नौटकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून जिल्हा बंदी आहे. सोमय्या तक्रारी करत आहेत ना!. नाहीतरी राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या आहेत मग त्यांचे काम भाजपाच करणार का? असा खोचक सवाल करत सावंत यांनी टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!