Share

‘उद्धव ठाकरेंनी मला धमक्या देण्यापेक्षा मुश्रीफ, परब, सरनाईक यांना अटक केली पाहिजे’

Published On: 

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं जात नसून पोलीस मला अटक करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व बेकायदेशीर असून कोल्हापूरमध्ये मला जिल्हाबंदी आहे, मात्र मला मुंबईत देखील पोलीस घराबाहेर पडू दिलं जात नाहीये, असं किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच, अशाप्रकारे मला धमकावण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार करणाऱ्या हसन मुश्रीफ, अनिल परब, प्रताप सरनाईक, किशोर पेडणेकर, गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करावी, असं आव्हान देखील सोमय्या यांनी दिलं आहे.

‘गृहमंत्र्यांनी हा आदेश दिलाय की, कोल्हापूरला येऊ नयेत. कारण ते आले तर ते हा घोटाळा बाहेर काढतील आणि अनिल देशमुखांनंतर मुश्रीफ यांच्या मागे देखील चौकशीचा ससेमिरा लागून जेलमध्ये जावं लागेल. हसन मुश्रीफ यांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्यांचे तीन घोटाळे माझ्या हातात आहेत. सरकार घाबरले आहे. म्हणूनच ते माझी अटक करत आहेत. पण ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांना आम्ही जेलमध्ये पाठवूच,’ असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!