Share

किरीट सोमय्या स्थानबद्ध ? फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येत आहेत. सोमय्या यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची तयारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सुरू आहे. यामुळे संघर्षाची चिन्हे आहेत.

आपला दौरा जाहीर केल्यानंतर काही वेळातच किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदेश दिल्याचा सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केलाय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सोमय्या यांना सध्या स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील,’ अशी गर्जना फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

सोमय्या यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय ?

किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाकरे सरकारची दडपशाही. माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी आदेश दिलेत.’ तसेच सोमय्या म्हणाले की, ‘मी मुलुंड निलम नगरहून ५.३० ला निघणार, आधी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवाना होणार आहे.’

https://twitter.com/KiritSomaiya/status/1439528417586679811?s=20

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!