Share

सोलापुरात राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांनीही मारली मुलाखतीला दांडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर कॉंग्रेस पक्षाने राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेयला सुरवात केली आहे. आज सोलापूर येथे आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. मात्र या मुलाखतीला कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी दांडी मारली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत राहिले आहेत.

हे अनुपस्थितीत राहिलेले नेते सध्या भाजपात जाणार असल्याच्या चर्चेत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला देखील येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडणार असल्याचं दिसत आहे. भारत भालके यांनी भाजप नेत्यांशी जवळीकता वाढवली आहे. तर खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा चांगला सलोखा आहे. त्यामुळे भारत भालके देखील कॉंग्रेसचा हात सोडत भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. त्यावेळीही बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे हे दोघेही मुलाखतींना अनुपस्थित राहिले होते. आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या तर बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सोलापुरातील हे चार आमदार मुलाखतींना अनुपस्थित राहिल्याने जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भविष्याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!