Share

पक्षांतराच्या मुद्यावरून संजय राऊतांनी केली टोलेबाजी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – सेनेत आयात नेत्यांचे प्रमाण वाढले आहे. यावरून शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी निष्ठेला पायदळी तुडवणाऱ्या नेत्यांवर आणि पक्षांवर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि भाजपला शिव्या घालणारे नेतेचं भाजपात प्रवेश करत आहेत, शेवटी उगवत्या सूर्यालाचं सगळे नमस्कार करतात, असे म्हणत संजय राऊत यांनी टोलेबाजी केली आहे.

भाजपामध्ये होणारे प्रवेश केवळ स्वार्थापोटी होत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणतात. कोणी कुठे गेल्यावर शुद्ध होतो, यावर माझा विश्वास नाही. गरजेतून राजकारणात तडजोडी होतात, असे पाटील म्हणाले. तसेच सचिन अहिर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. त्यांना आम्ही कोणतंही वचन दिलेलं नाही. कोणत्याही कमिटमेंटशिवाय ते शिवसेनेत आले आहेत,’ असे म्हणत राऊत यांनी आहिर यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले.

दरम्यान विधानसभा निवडणुकांना आता काही काळ शिल्लक राहिला आहे. मात्र त्या पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष खिळखिळा झाला आहे. सत्ता असताना केलेले घोटाळे झाकण्यासाठी आणि आपल्यावर कोणत्याही चौकशीची टांगती तलवार असू नये, यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!