टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. हा आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आपलं नंबर वन स्थान राखलं आहे.
टीम इंडिया ११३ अंकासह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड १११ अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया या यादीत पाचव्या स्थानावर आहे, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या आणि वेस्ट इंडिया आठव्या स्थानावर आहे.
तसेच फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली ९२२ अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. केन विलियमसन ९१३ अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर चेतेश्वर पुजारा ८८१ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीमध्ये पॅट कमिन्स, जेम्स अँडरसन, कागिसो रबाडा हे अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

