टीम महाराष्ट्र देशा : बऱ्याच दिवसांच्या गोंधळानंतर कर्नाटकमध्ये आता भाजपने सत्ता स्थापन केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या सरकारने सहा मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे भाजपने आणखी एका राज्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
आज कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. या ठरावत भाजपला १०६ मते पडली. तर काँग्रेस जेडीएस यांनी विरोधात मतदान केले. विरोधी बाजूकडे १०० मते पडली. त्यामुळे येडीयुरप्पा सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध करत सत्ता स्थापन केली आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेचे सभापती के आर. रमेशकुमार यांनी रविवारी जे काँग्रेस व जेडीएसचे १७ बंडखोर आमदार होते त्यांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे ते या मतदानात भाग घेऊ शकले नाही. त्यामुळे भाजपचे संख्याबळ वाढले आणि भाजपने या विश्वास दर्शक ठरवत विजय मिळवला आहे.
Karnataka Chief Minister BS Yediyurappa wins trust vote through voice vote. pic.twitter.com/DvzzMmYCqa
— ANI (@ANI) July 29, 2019
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष पहायला मिळाला. यामध्ये सत्ताधारी कॉंग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांनी बंडखोरी करत कुमारस्वामी यांचे सरकार पाडले होते. त्यामुळे त्या बंडखोर आमदारांना वळवण्यात कॉंग्रेसला अपयश आले होते. या सगळ्याचा आज अंत झाला आहे.


