🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. यातच आता कोरोनाच्या विळख्यात अनेक सर्वसामान्य नागरिक ते कलाकार,नेतेमंडळी अश्या सर्वच क्षेत्रातील लोकं अडकत आहेत.
दरम्यान, आज राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ते होम आयसोलेटेड आहेत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव आल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगिकरणांत आहे, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व टेस्ट करून घ्यावी.
सर्वाना विनंती आहे की,शासनाच्या सूचनांचे पालन करावे,आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्यावी,मास्क वापरा,विनाकारण घराबाहेर पडू नका.— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) April 5, 2021
गेल्या काही काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने अक्षरक्षः थैमान घातल्याने राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली आहे.यातूनच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्यात पाच एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसा जमावबंदीचा आदेश जारी झाला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू राहणार आहेत. याशिवाय शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लाॅकडाऊन राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- उपचारात हलगर्जीपणा केल्यास खैर नाही, आ. मेघना बोर्डीकर यांचा सज्जड इशारा
- बीड जिल्हा; लॉकडाऊन उठविले, मात्र हॉटेल, रेस्टॉरंट बंदच
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
