Share

‘..तर मग मोदी सरकार काय करतंय?’; बाळासाहेब थोरातांचा सवाल

Published On: 

मुंबई : पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट घातक आहे. तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. या सर्वांवर उपाय लसीकरण आहे. मात्र, असे असताना केंद्राचे कुठलेही नियोजन दिसत नाही आणि कुठलेही धोरण नाही. सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. तसेच लसीकरणाचे धोरण केंद्राकडे नाही, असे म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केला आहे. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्लानिंग करायला कोर्ट सांगत आहे. पण केंद्र जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्यांवर ढकलून देत आहेत. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीत. लसीकरणासाठी केंद्राकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. लसीकरणासाठी असणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ होत आहे. अॅपचे नियोजन राज्याने केले पाहिजे, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राला विनंती केली आहे की, आम्हाला आमचे अधिकार द्या. आज केंद्र सरकारचे निष्क्रिय धोरण दिसून येत आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!