Share

एक वेळ अशी येईल तो केवळ ‘मिस्टर ३६०’ म्हणुन सदैव स्मरणात राहिल, सेहवागकडुन एबीची स्तुती

Published On: 

मुंबई : ‘मिस्टर ३६०’ हे नाव उच्चारताच क्रिकेटप्रेमीच्या मनात येतो तो एबी डिव्हिलीयर्स. भल्या भल्या दिग्गजांना एबीने आपल्या बॅटने पाणी पाजले आहे. एबीला मिस्टर ३६० नाव पडले कारण एबी डिव्हीलीयर्स कोणताही चेंडु त्याला जिथे हवा तिथे आरामात मारु शकतो. मैदानात त्याला शॉट खेळायला कोणतेही बंधन नसल्याप्रमाणे तो खेळतो. त्यामुळे त्याला मिस्टर ३६० म्हणले जाते.

नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत एबीने भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही सोडले नव्हते. यादरम्यान भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने एबीचे कौतुक करताना म्हणाला आहे की, ‘एबी डिव्हीलियर्सचं खरं नाव कदाचित लोक विसरुन जातील, मात्र मिस्टर ३६० हे नाव सदैव स्मरणात राहिल’ नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सेहवागने हे वक्तव्य केले आहे. तीन वर्षापुर्वी निवृत्ती घेतलेल्या एबीच्या पुनरागमनाची चर्चा जोरदार सुरु आहे.

यावेळी बोलताना सेहवागने दिल्लीविरुद्धच्या एका सामन्याचा संदर्भ दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉयनिसने एबीला ऑफ-स्टंपच्या बाहेर काही चेंडु टाकले होते. हे चेंडु एबीने न खेळता सोडले होते. मात्र एबीला लक्षात आले की त्याने ते चेंडु सोडुन चुक केली आहे. यानंतर पुढच्याच चेंडुवर त्याने आऊटसाईड ऑफला जाऊन आखुड टप्प्याच्या चेंडूवर षटकार मारला. कारण एबीला माहित होते की तोही चेंडु पुर्विप्रमाणेच येईल. एबी डिविलियर्सने आयपीएल २०२१ हंगामात दिल्लीविरुद्ध ४२ चेंडूत ७५ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले होते. हा सामना आरसीबीने १ धावेने जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!