Share

‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’

Published On: 

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय करता येईल यासाठी सध्या राज्य सरकार विविध अंगांनी विचार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगानंतर आखणी एक नवीन आयोग बसवण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला सुनावले आहे. समाजाला माग ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. त्यामुळं नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, असं म्हणत पटोले यांनी सुनावलं आहे.

नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, भाजपला 24 तास फक्त सत्ता पाहिजे, देशात कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारात लागले होते, अशी टाकी नाना पटोले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!