Share

खरं तर माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीमुळेचं वाचला ; अश्विनने सांगितला भावूक प्रसंग

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा फिरकीपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा हुकमी एक्का आर. अश्विनच्या कुटुंबावर मध्यंतरी कठीण परिस्थिती ओढावली होती. अश्विनच्या कुटुंबातील १० जणांना कोरोनाची लागण झाली होती. दुर्दैवाची गोष्ट यामध्ये ४ लहान मुलांचाही समावेश होता. अश्विनची पत्नी प्रिती नारायणन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली कठीण परिस्थिती सांगितली होती.

आर अश्विननची पत्नी प्रीतीने कोणत्या परिस्थितीतून आम्ही सध्या जात आहोत त्याची माहिती ट्वीट करून दिली होती. ‘ कुटुंबातील ६ मोठे तर ४ मुलं अशा १० जणांना मिळून कोरोनाची लागण झाली होती. या सगळ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’ कोरोनाच्या या महासंकाटत आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचं आवाहन देखील आर अश्विनच्या पत्नीने केलं होतं. कोरोनाची लस घेण्याचं आवाहन देखील ट्वीटमधून केलं आहे.

कुटुंबीयांच्या चिंतेने अश्विनने आयपीएलमधून देखील ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. माझं कुटुंबीय कोरोना सारख्या जागतिक संकटाचा सामना करत असताना मी त्यांच्यासोबत असायलं हवं, असं म्हणत त्याने आयपीएल २०२१ ची स्पर्धा अर्ध्यावरच सोडली होती.

दरम्यानअश्विनने या काळातील एक भावुक प्रसंग सांगितला आहे. ‘माझ्या सगळ्या कुटुंबावर कोरोना सारख्या भयंकर महामारीची सावली पडली होती. माझ्या वडिलांची तब्येत पहिल्यांदा ठीक होती पण नंतर त्यांच्या ऑक्सिजनची लेव्हल 85 वर आली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. डिस्जार्च मिळूनही त्यांच्या ऑक्सिजनच्या लेव्हलमध्ये फरतक जाणवत नव्हता. माझ्या वडिलांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. खरं तर मी असं म्हणेन की माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीनेच वाचवला’, असं अश्विनने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!