Share

…मग नेमकं महाराष्ट्र सरकार करतंय तरी काय ? राज्यपालांचा महाविकास आघाडीवर निशाणा

Published On: 

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज नाशिक दौऱ्यावर होते. सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या गुलाबी गावात आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उदघाटन कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. सुमारे १११३७ लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आले.

यावेळी राज्यपालांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली. ‘ या भागात भरपूर पाऊस पडतो. पण सर्व पाणी समुद्राला वाहून जातं. पाणी अडवण्यासाठी तुम्ही मदत करा. हा भाग समृद्ध होईल,’ असं झिरवळ म्हणाले.

झिरवळ यांच्या मागणीवरून कोश्यारी यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘झिरवळ सरकारमध्ये आहेत. पण ते माझ्याकडे मागणी करतात. मग राज्य सरकार काय करतंय? धावपटू कविता राऊतला नोकरी देण्यात आली नाही. क्रीडामंत्री केवळ नोकरी देण्याची भाषा करत आहेत. काहीच करत नाही. मग सरकार नेमकं काय करतंय ?,’ असा सवालच त्यांनी कार्यक्रमावेळी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!