Share

“बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट; यावर कुणाचाही वचक राहिला नाही”, पंकजा मुंडेंचा संताप

Published On: 

बीड: राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांनी बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे चित्र सध्या निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. आणि याचा अर्थ आहे की, मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे. कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि याच्यावर कोणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही. मी याचा तीव्र निषेध करते. असा संतापही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्यात २००९ साली जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा मुलींचा जन्मदर हा राज्यातला सर्वात कमी जन्मदर होता. या गोष्टीमुळे मनामध्ये खूप तीव्र दुःख होऊन एनजीओच्या माध्यमातून मी काम केलं. पालक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि महिला बालकल्याण विभागाचा कार्यभार माझ्याकडे आला तेव्हा पहिली योजना मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी डिक्लेअर केली. त्या कामाचा परिणाम म्हणजे, बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ९६१ इतका झाला होता.

मात्र आता बीड जिल्ह्यात पुन्हा पहिल्यासारखी स्थिती झाली आहे. जिल्ह्यात पीसीपीएनडी अ‌ॅक्टचा वापर केला जात नाहीये. त्यामुळे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ योजनेत प्रबोधन, जागरण, जागृती करण्याची गरज आहे. त्याबद्दल सर्वांनी भाग घ्या, हे बीड जिल्ह्याचे चित्र कधी आपल्याला दिसले नाही पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!