🕒 1 min read
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार अधिवेशन घेण्यासाठी घाबरत आहे, अशी टीका गेले अनेक दिवस भाजप करत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं घ्यायचं या विवंचनेत राज्य सरकार होतं. त्यामुळेच साधारणतः महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवस चालणार आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता गेल्या वर्षभरातील अधिवेशने आटोपतीच घेण्यात आली. विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यास महाविकास आघाडी घाबरते, यामुळेच अधिवेशन कालावधी घटवला जातोय अशी टीका भाजप नेत्यांनी केला आहे. अधिवेशन आलं की कोरोना रुग्णांची संख्या कशी काय वाढतेय ? असा प्रश्न देखील भाजपने केला आहे.
भाजपच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जर एवढचं वाटतंय तर विरोधकांनी त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं,’ असं आव्हानच हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.
असे होणार अधिवेशनाचे कामकाज –
- पहिला दिवस (१ मार्च) – राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव
- दुसरा, तिसरा दिवस (२ मार्च, ३ मार्च) – राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा
- चौथा, पाचवा दिवस – (४ मार्च, ५ मार्च) – पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान
- सहावा, सातवा दिवस (६ मार्च, ७ मार्च) – शनिवार, रविवारची सुट्टी
- आठवा दिवस (८ मार्च) – अर्थसंकल्प सादर होणार
- नववा दिवस (९ मार्च) – शासकीय कामकाज
- दहावा दिवस (१० मार्च) – अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता
महत्त्वाच्या बातम्या
- आपली मराठी भाषा अजिबात लेचीपेची नाही; वाचा मराठी राजभाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचं खास पत्र !
- पक्षांतर्गत नाराजी कमी करण्यासाठी नाना पटोलेंची खेळी ? संजय निरुपम यांना काँग्रेसने दिली मोठी संधी
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

