Share

पक्षांतर्गत नाराजी कमी करण्यासाठी नाना पटोलेंची खेळी ? संजय निरुपम यांना काँग्रेसने दिली मोठी संधी

Published On: 

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागल्या पासून काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. २०१४ नंतर केंद्रासह अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथा पालथेनंतर महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेस सहभागी झाला. आता, काँग्रेसने पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे गेली काही वर्षे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. कित्येकदा त्यांनी उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला होता. शिवाय शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यास देखील त्यांनी विरोध केला होता. आता, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. एकप्रकारे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षांतर्गत नाराजी सत्र संपवण्यासाठी ही रणनीती दाखल्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाने संजय निरुपम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. निरुपम यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

या पत्रकानुसार, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत व संसदीय मंडळावर आणखी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड व माजी आमदार जनार्दन चांदुरकर यांची देखील संसदीय बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून आणखी चौघांना स्थान देण्यात आलं आहे. यात नाना गावडे, सचिन नाईक, संजय राठोड आणि चारुलता टोकस यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!