Share

…तर पुण्यातील दुकाने परस्पर संध्याकाळपर्यंत उघडी ठेऊ; व्यापारी महासंघाचा इशारा

Published On: 

पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केली. यानुसार २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्यात आले. तर कोरोना स्थिती लक्षात घेता ११ जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता लेवल ३ चे निर्बंध कायम ठेवले आहेत. यासोबतच, गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील, असं टोपे यांनी सांगितलं. या ११ जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेते आणि व्यापारी यांनी केली आहे. दरम्यान, पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यवहार व दुकाने बंद ठेवून राज्य सरकार व प्रशासनाला सहकार्य केलं होतं. आता कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या कमी होऊन देखील निर्बंध का लागू ठेवले आहेत ? असा सवाल पुण्यातील व्यापारी महासंघाने केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन महासंघातर्फे राज्य सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे.

‘पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून सरकारनं ऐकलं नाही, तर बुधवारपासून दुपारी ४ नंतरही दुकानं सुरु ठेऊ, असा इशारा दिला आहे. यासोबतच, कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून व्यापाऱ्यांना जरी अटक केली, तरी आम्ही मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या फतेचंद रांका यांनी जाहीर केली आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अन्यथा आम्ही ती उघडी ठेऊ, असं देखील महासंघातर्फे सांगण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!