मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींचा लवकरच कायापालट होणार आहे. 10 बाय 10 च्या खोल्या असलेल्या वरळीकरांना लवकरच आलिशान फ्लॅट मिळणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारतींचं बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडलाय.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर मंत्री देखील उपस्थित होते. हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे महाविकास आघाडीतील मंत्री सांगत असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1421782458752634882?s=20
‘बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते. आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे,’ असा उपरोधिक टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हे फक्त याचिका करत राहतील; ओबीसी समाजाला आरक्षण द्यायची या सरकारची इच्छाच नाही’
- आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही – देवेंद्र फडणवीस
- ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय; छगन भुजबळ आक्रमक
- उद्धव ठाकरे यांनी जागवल्या बीडीडी चाळीतील आठवणी, म्हणाले…
- काँग्रेस गाजावाजा करत नाही, प्रत्यक्ष मदत करते- नाना पटोले


